Call: +91 90281 70123

व्यायामशाळेत हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा अचानक झटका येण्याची काय कारणं आहेत?

डॉ. घोगरे म्हणाले, “हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी नावाची एक अवस्था असते, ही अवस्था अनुवंशिक असते. यामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत असतात. तसेच काहीवेळेस आर्थिमियास नावाची स्थिती असते, यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि जास्त शारीरिक ताण आला तर त्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. आणखी एक शक्यता म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसिज यात हृदयातील वाहिन्या आतून बंद होत जातात किंवा पूर्ण बंद झालेल्या असतात यामुळे रक्तप्रवाह पुरेसा होण्यात अडथळा येतो. यातील अनेक गोष्टी सुप्तावस्थेत असतात त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपण हृदयासंबंधी तपासणी करणं आणि आपले शरीर कोणते संकेत देतंय याकडे लक्ष दिलं पाहिजे.”

View All